PDA

View Full Version : जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र ..



qesehmk
04-30-2015, 10:56 PM
In honor of Maharashtra Day tomorrow. Maharashtra -- India's most progressive state not just by economic measures but with 700 years of history of struggle for social equality from all sections of the society.

Poet - Raja Badhe

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा (Hail to the state of Maharashtra. Say proudly this is my Maharashtra)
रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी ( (Although) there are various rivers )
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी (The water they carry is the same)
भीम थडिच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा (Take these colts from the river Bheema all the way to Yamuna)
गर्जा महाराष्ट्र माझा (Say proudly this is my Maharashtra)

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणार्या नभा (We are not afraid of any calamities)
अस्मानी या सुलतानीला जबाब देती जिव्हा (We stand up to the tyrants)
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा (The spirit of Shivaji - the lion of sahyadri - speaks through us)
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा (All corners of Maharashtra say in one voice - this is my Maharashtra)

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी (Our land is rugged. And yet we have carved beautiful sculptures out of it)
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी (Our arms are strong and we can sacrifice our lives)
दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला (We are people who can work our way through poverty by hard work)
देश गौरवासाठी झिजला (and have always worked to keep the honor of India)
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा (we even provided protection to the (mughal) king of Delhi)

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा (Hail to the state of Maharashtra. Say proudly this is my Maharashtra)

suninphx
04-30-2015, 11:18 PM
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्*तीच्या दळदारी देशा
भावभक्*तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥



जय महाराष्ट्र !!